साहित्य:
१) कुठलीही उरलेली भाजी. तयार विकत आणलेली असल्यास उत्तम .. तेवढीच चवीची खात्री. भाजी उरलेली नसल्यास ताज़ी भाजी करावी. करताना मुद्दाम जास्त करावी आणि भाजी उरली की दुसऱ्या दिवशी पुढील पाककृती वाचावी.
२) कम्बोडियामधे एकूण धान्य उत्पादनापैकी ९०% भात पिकतो, म्हणून आपणही भातच खावा. पोळी, भाकरी असल्या अवघड आणि गोलमाल पदार्थांच्या भानगडीत पडू नये. (लक्षात ठेवा: शहाण्याला भाताचा मार). भात शिळा असल्याची खात्री करून घ्यावी. भाताचे प्रमाण भाजीच्या सव्वा ते दीडपट (यडपटला छान यमक आहे) ठेवावे.
३) चमचाभर तेल किवा तूप. नसल्यास शेजारयांकडून आणावे. परत करू असा बोल कधीही देऊ नये. शेजारी गुल असल्यास, वाहतुकीच्या साधनाना लाखोली वहावी आणि चमचाभर पाणी वापरावे.
कृती:
१) कढई किवा तत्सम भांडे घासून घ्यावे. (भांडे धुवून तयार असल्यास आपण विशेष कार्यक्षम आहोत असा समज करून घ्यावा आणि वेगळी पाककृती करण्याची कृपा करावी).
२) भांडे तापायला ठेवावे. यात गैस/ स्टोव अश्या वस्तू चालू स्थितीत आहेत ही अपेक्षा. (काय नाही.... हल्ली फार अपेक्षा वाढल्या आहेत लोकांच्या... सगळ राजकारण हो दुसर काय).
३) भांडे पुरेसे तापले आहे का याची खात्री करावी. बोट लावून पहाण्याचा शिष्टपणा करू नये.. भाजेल (अनुभवाचे बोल). किंचित पाणी शिंपडावे, चटकन वाफ झाल्यास भांडे तापले आहे समजावे.
४) आता चमचाभर जे काय असेल ते घालावे (पहा साहित्य ३)
५) शिळी भाजी घालून सव्वा मिनिट गरम होऊ द्यावी. ३-४ मिनिट इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही.
६) शेवटी भात टाकावा आणि मिश्रण भुरभूरीत सोनेरी होईपर्यंत हलवावे. हा भुरभूरीत सोनेरी रंग कसा असतो माझे मला नकळे, पण सगळे म्हणतात म्हणून.
७) मिश्रण हलवून दम लागला किवा ३ मिनिट झाले की थांबावे. गैस बंद करून गरम गरम भाजी-भात वाढावा. आणि वेगळ काय सांगायच ... स्वतःच खावा.
असा भाजी-भात केचअप/ लोणचे/ चटणी बरोबर चविष्ट (असली विशेषण कुठून आणतात सांगा हो) लागतो. कुणी नको असलेले पाहुणे येणार असल्यास हा पदार्थ आवर्जून करावा.
6 comments:
Jamalaya
Aaani varil kahich kalat naslyass..
Dominos,pizza hut kiva burger king kade sharan jaavee...
hehehe....ashukkya :)
ha ha ha ha, mastach
:) ...... khupach chavishta zalay bhaji-bhat!
Zakkkaaaaaaaaaaaas !!!
Post a Comment